मालवण- बांदिवडे ता. मालवण येथील, व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मसुरे-मर्डे-ग्रा-प-वर-शिव/
मुंबईचे माजी महापौर कै. रमेश प्रभु यांच्या समाजसेवेचा वारसा लाभलेले, त्यांचे हुशार व अभ्यासु चिरंजीव अरविंद प्रभु, ज्यांचे नाव यापुढे आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशन (IPF) त्याचबरोबर
ते आखिल भारतीय पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष,तसेच मुबई उपनगर टेबल टेनिस असोसियशन चे अध्यक्ष आणि अंधेरी मल्लखांब संघाचे अध्यक्ष, जमनाबई नरसी शाळेत असताना बॅडमिंटन मध्ये सहभाग तसेच महाराष्ट्रातील सार्या क्रिडा रसिक व तज्ञांना, खात्री आहे की क्रीडा क्षेत्रातील यांचा विपुल अनुभव आयपीएफला पिकलबॉलसाठी एकमेव प्रभावी जागतिक प्रशासकीय संस्था म्हणून घेऊन जाईल. प्रभू यांच्या या निवडीमुळे पारले मुंबई व सिंधुदुर्गातुन, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


